Punit Balan | दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संस्थेला युवा उद्योजक पुनीत बालन यांची भेट; संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Punit Balan | तब्बल शंभर वर्षांपेक्षा अधिक कालावधीहून शहर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कार्यरत असलेल्या ‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी’ (The Poona District Police Co-operative Credit Society) या संस्थेच्या कार्यालयास युवा उद्योजक पुनीत बालन (Young entrepreneur Punit Balan) यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाला शुभेच्छा देऊन संस्थेच्या सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

‘पुनीत बालन ग्रुप’च्या (Punit Balan Group (PBG) माध्यमातून पोलीस आणि अधिकारी कर्मचारी (Pune Police) यांच्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. याच कृतज्ञतेच्या भावनेतून ‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी’ने पुनीत बालन यांना कार्यालयात निमंत्रित केले होते. त्यानुसार बालन यांनी सोमवार पेठ पोलीस लाईन (Somwar Peth Police Line) येथील कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कामाची माहिती घेतली. यावेळी अध्यक्ष विठ्ठल घोरपडे यांनी त्यांचे स्वागत करत संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात जून १९२० रोजी झाली. या संस्थेत पुणे शहरसह, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस, सीआयडी. क्राईम, एसआरपीएफ, अॅन्टीकरप्शन, एस.आय.डी, वायरलेस आणि इतर विभागातील तब्बल १३ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी हे या संस्थेचे सभासद आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या चोख आणि काटेकोर कारभारामुळे २०२१ ला संस्थेला आय.एस.ओ हे मानांकनही मिळाले आहे.

या संस्थेच्या संचालक मंडळाची गेल्या महिन्यात निवडणूक झाली. या नवनिर्वाचित संचालकाशीही पुनीत बालन यांनी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. तसेच कार्याचे कौतुक करत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

‘‘‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी’ ही पोलिस बांधवांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तत्काळ मदतीला धावून जाणारी संस्था आहे. या संस्थेच्या आजवरच्या सर्व संचालक मंडळाने केलेल्या उत्तम कारभारामुळं संस्थेचीही भरभराट होत असून नवीन संचालक मंडळही असाच कारभार करुन संस्थेला अधिक उंचीवर नेईल, असा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा!’’

पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)

Pune Hadapsar Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार व सात लाखांची फसवणूक

Leave A Reply

Your email address will not be published.