Pune PMC News | खड्डेमुक्त जंगली महाराज रस्त्याच्या मेन्टेनन्ससाठी 2 कोटी रुपयांची निविदा

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune PMC News | पुण्याच्या इतिहासामध्ये चाळीस वर्षांहून अधिक काळ खड्डेमुक्त राहीलेल्या रस्त्यावर मागील काही वर्षात दुरूस्तीची कामे करून महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) या रस्त्याचा लौकीक जपला आहे. आजमितीला या रस्त्यावरील पदपथही सुशोभीत करण्यात आले आहेत. मात्र, याच रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी तब्बल दोन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्याने नेमके या रस्त्यावर कोणते काम केले जाणार आहे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (Pune PMC News)

स.गो.बर्वे चौकापासून थेट डेक्कन चौकापर्यंतच्या जंगली महाराज रस्त्याचे (JM Road Pune) १९७६ मध्ये डांबरीकरण करण्यात आले आहे. अगदी आठ ते नउ वर्षांपुर्वीपर्यंत दुहेरी वाहतूक असलेल्या या रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढल्यानंतर तो एकेरी करण्यात आला. हा रस्ता एकेरी करताना रस्ता दुभाजक काढून टाकण्यात आले. अवघ्या चार ते पाच वर्षांपुर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत या रस्त्याचा मॉडेल रस्ता म्हणून विकास करण्यात आला. त्याचे पदपथ प्रशस्त केले गेलेत. पदपथावर बसण्यासाठी कट्टे, झाडे लावण्यात आलीत. एवढेच नव्हे तर सायकल ट्रॅकही करण्यात आला आहे. ही कामे झाली असतानाही गेल्या ४७ वर्षात अनेक उून पावसाळे झेलूनही या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम हे आदर्श प्रमाण मानले गेले आहे.

मध्यंतरी गेल्या काही पावसाळ्यांमध्ये फर्ग्युसन रस्त्यावरून येणार्‍या पावसाचे पाणी संभाजी बाग परिसरात साठून राहात असल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप येउ लागले आहे. प्रशासनाने याचा शोध घेतल्यानंतर पदपथाचे काम करताना तसेच मेट्रो स्टेशनच्या कामामुळे येथील पावसाळी गटार बंद झाल्याने वहनक्षमता कमी होउन पाणी साठून राहात असल्याचे निदर्शनास आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने हातोहात दुरूस्ती करून घेतल्याने ही समस्याही बर्‍याचअंशी कमी झाली आहे. त्यामुळे आजही खड्डेमुक्त व शहरातील आदर्श रस्ता म्हणून जंगली महाराज रस्त्याचे दाखले दिले जातात. (Pune PMC News)

दरम्यान, महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्यावरील गरवारे चौक ते सुभाषचंद्र बोस चौक या दरम्यानच्या देखभाल दुरूस्तींच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली. यासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचे एस्टीमेट तयार करण्यात आले. या कामासाठी ७ निविदा आल्या. त्यापैकी ३ पात्र ठरल्या. निविदेपक्षा ११ टक्के दराची निविदा अर्थात सुमारे २ कोटी ५ लाख रुपयांची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे. रस्ता तर खड्डेमुक्त आहे. पदपथही नव्याने तयार केलेेले असल्याने सुस्थितीत आहेत. असे असताना या निविदेतून नेमकी कोणती देखभाल दुरूस्ती करण्यात येणार आहे याचा तपशील मात्र विषयपत्रात देण्यात आलेला नाही. त्यामुळे शंका उपस्थित करण्यास वाव मिळत आहे.

जंगली महाराज रस्त्यावर ठिकठिकाणी शोभेसाठी प्लान्टेशन केले आहे. त्यांचा मेन्टेनन्स.
तसेच या रस्त्यावर झेब्रा कॉसींगचे पट्टे मारण्यासाठी पाच वर्षासाठी निविदा काढण्यात आली आहे.
यापुर्वीच्या ठेकेदाराची कामाची मुदत संपल्याने नव्याने निविदा काढण्यात आली आहे.
तसेच जंगली महाराज रस्त्याच्या कडेला असलेल्या काही मिळकतींनी रस्त्यालगत असलेल्या
जलवाहीन्यांतून पाण्याची कनेक्शन घेतल्याने तेथे रस्त्याच्या दुरूस्तीसाठीचे काम करण्यासाठी ही निविदा राबविण्यात आली आली.

– दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.