Pune Pimpri Chinchwad Crime News | वडिलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला मारहाण, वायसीएम हॉस्पिटलमधील घटना

पिंपरी : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने डॉक्टरला मारहाण (Doctor Beaten) केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) रविवारी (दि.10) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी एका तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात (PCPC Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत डॉ.ऋषिकेश हनमंत कुदळे Dr. Rishikesh Hanmant Kudale (वय-25 सध्या रा. वायसीएम हॉस्पिटल, पिंपरी मुळ रा. कोटेश्वर कॉलनी, शुक्रवार पेठ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन महेश राजाराम कुंभार (वय-25 रा. वाघोली, ता. वरुड, जि. धाराशिव) याच्यावर आयपीसी 353, 332, 504 सह महाराष्ट्र वैद्यकिय सेवा व्यक्ती आणि वैद्यकिय सेवा संस्था अधिनियम 2010 चे कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश कुंभार याच्या वडिलांवर वायसीएम हॉस्पिटल मधील आयसीयू वार्ड
क्र. 3 मध्ये फिर्यादी डॉ. कुदळे हे उपचार करीत होते. उपचार करत असताना दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आरोपीचे वडील राजाराम कुंभार यांचे निधन झाले. याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यावेळी मयत राजाराम कुंभार यांचा मुलगा महेश हा वॉर्डमध्ये आला. त्याने डॉ. कुदळे यांच्याकडे वडिलांच्या मृत्यूबाबत चौकशी केली. त्यानंतर वडिलांच्या बेडजवळ जाऊन थोडा वेळ रडला. त्यानंतर रागाने येऊन डॉ. कुदळे यांना मारहाण करत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
- Pune Crime News | पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाला डोकं फुटेपर्यंत मारहाण, धनकवडी परिसरातील घटना
- Manoj Jarange Patil | अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जवरून जरांगेंची जोरदार टीका, ”देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले तर…”
- ISIS Terror Conspiracy Case | पुण्यासह देशभरातील 44 ठिकाणी एनआयएचे छापे; 13 स्लिपर सेलना घेतले ताब्यात