Pune Crime News | सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन महिलांचा विनयभंग, वडकी परिसरातील घटना

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पार्किंगमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) तोडल्याचा जाब विचारला असता एकाने दोन महिलांसोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वकडी परिसरातील एका सोसायटीमध्ये शुक्रवारी (दि.8) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत 45 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी मनीष ईश्वर भटेवरा Manish Ishwar Bhatewara (रा. स्वारगेट-Swargate) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 504, 506, 509, 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा वकडी परिसरातील एका सोसायटीत असलेला फ्लॅट फिर्य़ादी यांनी खरेदी केला आहे. त्यांनी पार्किंगमध्ये सीसीटीव्ही बसवले होते. आरोपीने शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोसायटीत येऊन पार्किंमध्ये लावलेले कॅमेरे तोडले. याबाबत बिल्डिंगमधील महिलांनी आरोपीकडे जाब विचारला. त्यावेळी आरोपीने कॅमेरे तुमच्या घरात लावायचे, पार्किंग काय तुमच्या बापाची आहे का असे म्हणत फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात गैरवर्तन केले.
तसेच फिर्य़ादी यांच्या सोबत असलेल्या एका महिलेला ढकलून देत स्त्री मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.
आरोपीने फिर्य़ादी यांनी लावलेल्या कॅमेऱ्याचे नुकसान करुन शिवीगळ केली.
तसेच मी कोणाला घाबरत नाही, माझ्या कामाच्या मध्ये कोणी आले तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी
दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खैरनार (API Khairnar) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- ‘त्या’ महिलेचा खूनच ! न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट, सव्वा तीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल; पर्वती येथे आढळला होता मृतदेह
- शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार
- अश्लील मेसेज करुन महिलेचा विनयभंग, सहकारनगर मधील घटना
- उत्तमनगर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 66 वी स्थानबध्दतेची कारवाई
- लोकलने प्रवास करायचाय अगोदर ब्लॉक पाहून घ्या; ब्लॉकमुळे पुणे लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द