Pune Crime News | ‘त्या’ महिलेचा खूनच ! न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट, सव्वा तीन वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल; पर्वती येथे आढळला होता मृतदेह
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पर्वती टेकडीवर पाण्याच्या टाकीजवळ मृतावस्थेत एका अनोळखी महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. महिलेची ओळख पटली नाही, ना तिच्या मृत्यूचे कारण पोलिसांना (Pune Police) समजले होते. न्यायवैद्यक अहवालात (Forensic Report) महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन तिचा खून (Murder) केल्याचे समोर आले आहे. सव्वातीन वर्षानंतर महिलेचा खून केल्या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती टेकडी परिसरात अर्धवट बांधकाम करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीजवळ
17 ऑगस्ट 2020 रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेच्या शरीरावर जखमा नव्हत्या.
त्यामुळे याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. तसेच व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. (Pune Crime News)
पर्वती पोलिसांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून (Forensic Laboratory) नुकताच अहवाल प्राप्त झाला आहे.
या अहवालानुसार महिलेच्या डोक्यावर, तसेच छातीवर कठीण वस्तूने प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे अहवालात
नमूद केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Sr PI Jairam Paigude), पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे
(PI Vijay Khomene) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार
- अश्लील मेसेज करुन महिलेचा विनयभंग, सहकारनगर मधील घटना
- उत्तमनगर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 66 वी स्थानबध्दतेची कारवाई
- लोकलने प्रवास करायचाय अगोदर ब्लॉक पाहून घ्या; ब्लॉकमुळे पुणे लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द
- लोकलने प्रवास करायचाय अगोदर ब्लॉक पाहून घ्या; ब्लॉकमुळे पुणे लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द
- इंन्स्टाग्रामवर ओळख करुन महिलेवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करुन केली बदनामी; पुण्यातील धक्कादायक प्रकार