Pune Crime News | पुण्यातील भगिनी निवेदिता सहकारी बँकेला 50 लाखांचा गंडा

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील भगिनी निवेदिता बँकेकडे (Bhagini Nivedita Bank) तारण ठेवलेल्या फ्लॅटचे बनावट कागदपत्रे (Fake Documents) दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करुन फ्लॅटची विक्री करुन बँकेची 50 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 जुलै 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधित बँकेच्या प्रभात रोड शाखेत (Prabhat Road Branch) घडला आहे. (Pune Crime News)

गुरबिरसिंह धर्मवीरसिंग लांबा (Gurbir Singh Dharamvir Singh Lamba), त्याची पत्नी रमिता गुरबिरसिंह लांबा (Ramita Gurbir Singh Lamba), अमित रविकिरण गायकवाड (Amit Ravikiran Gaikwad) यांच्यावर आयपीसी 420, 406, 465, 467, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता किशोर देशपांडे Smita Kishore Deshpande (वय-57 रा. कर्वेनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरबिरसिंह लांबा व त्याची पत्नी रमिता यांनी त्यांच्या मालकीचा फ्लॅट भगिनी निवेदिता
बँकेकडे तारण ठेवून 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्याची दुय्यम निबंधक कार्यालयात (Sub-Registrar Office)
नोंदणी करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी संगनमत करुन फ्लॅटचे बनावट कागदपत्रे तयार करुन घेतले.
बँकेकडून घेतलेल्या 50 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली नसतानाही कर्ज फेडल्याचे भासवले.
दुय्यम निबंधक कार्यालयाकडे बनावट ‘रिलीज डिड’ दस्त तयार करुन सादर केला.
या दस्ताच्या सहय्याने तारण असलेला फ्लॅट अमित गायकवाड यांना विकला. या व्यवहाराची दस्त तयार केला.
अशा प्रकारे आरोपींनी बँकेचा विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे (PSI More) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.