Suicide In Maharashtra | लाजिरवाणी बाब! महाराष्ट्रात वर्षभरात २२ हजार ७४६ आत्महत्या, NCRB चा रिपोर्ट जाहीर

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – महाराष्ट्रात मागील वर्षभरात तब्बल २२ हजार ७४६ आत्महत्यांची (Suicide In Maharashtra) नोंद झाली आहे. ही आकडेवारी प्रगतशील म्हणून बिरूद मिरवणाऱ्या राज्यासाठी लाजिरवाणी बाब ठरली आहे. विशेष म्हणजे राज्यात कर्जबाजारीपणामुळे सर्वाधिक आत्महत्या (Suicide In Maharashtra) झाल्या आहेत. नुकताच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो National Crime Records Bureau (NCRB) ने २०२२ सालाचा वार्षिक रिपोर्ट जाहीर केला. या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या वार्षिक रिपोर्टनुसार, वर्षभरात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच २२ हजार ७४६ आत्महत्यांची नोंद झाली आहे. कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या धक्कादायक आहे. महाराष्ट्रात कर्जबाजारीपणामुळे सर्वाधिक १९४१ आत्महत्या झाल्या आहेत. त्यानंतर कर्नाटकात १३३५ आणि आंध्र प्रदेशात ८१५ आत्महत्या झाल्या आहेत.

कौटुंबिक समस्यांमुळे महाराष्ट्रात अनेकांनी आयुष्य संपवले. त्यापैकी अनेकांनी बेरोजगारी तसेच गरिबीमुळे आत्महत्या केली आहे. राज्यात बेरोजगारीमुळे ६४२, गरिबीमुळे ४०२ आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांमुळे ६४० नागरीकांनी आत्महत्या केली.

महाराष्ट्रात कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या (Suicide In Maharashtra) करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कौटुंबिक कारणांमुळे सुमारे ६ हजार ९६१ लोकांनी आत्महत्या केली.

देशातील चित्र भयावह

संपूर्ण भारतातील मागील वर्षाची आकडेवारी देखील भयावह आहे. भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांच्या ताज्या अहवालानुसार, २०२१ सालच्या तुलनेत २०२२ मध्ये जास्त आत्महत्या झाल्या आहेत. २०२१ साली हा आकडा १,६४,०३३ इतका होता मात्र २०२२ तो वाढून १,७०,९२४ इतका झाला आहे.

तामिळनाडूमध्ये १९,८३४ लोकांनी आत्महत्या केली. यानंतर मध्यप्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगालचा नंबर आहे.
२०२२ मध्ये भारतात दर तासाला १९ जणांनी आत्महत्या केल्या आहेत.
आत्महत्या केलेल्यांमध्ये रोजंदारी मजुरांचे प्रमाण सर्वाधिक २६.४ टक्के इतके होते. गृहिणींचे प्रमाण १४.८ टक्के इतके आहे.

महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये मिळून देशातील एकूण
आत्महत्यांपैकी ४९.३ टक्के आत्महत्या झाल्या आहेत.

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार, महिलांसाठी राजधानी दिल्ली हे सर्वात असुरक्षित शहर असल्याचे समोर आले आहे.
दिल्लीमध्ये २०२२ साली १,२०४ अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले.
देशभरात महिलांविरोधात झालेल्या अत्याचाराचे प्रमाण ३१.२० टक्के होते.
त्यानुसार, दिल्लीत दरदिवशी साधारणपणे तीन अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत.
एनसीआरबीच्या या रिपोर्टमध्ये १९ महानगर शहरांमधील रिपोर्ट केल्या गेलेल्या ४८ हजार ७५५ प्रकरणांचा उल्लेख आहे.
दिल्लीमध्ये सर्वाधिक १४,१५८ प्रकरणे समोर आली. त्यानंतर मुंबईत ६,१७६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.