Pune Crime News | पुतण्याकडून पाऊण कोटींची फसवणूक, पुण्यातील प्रकार
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पुतण्याकडे विश्वासाने घरातील कपाटाच्या आणि घराच्या चाव्या दिल्यानंतर त्याने 25 लाख 72 हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने (Gold-Silver Jewellery) तसेच बँक खात्यातील 50 लाख रुपये लंपास केली. पुतण्याकडून फसवणूक (Cheating Fraud Case) झाल्याचे समजल्यानंतर चुलतीने खडक पोलीस ठाण्यात (Pune Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2 एप्रिल 2018 ते एप्रिल 2023 या एक वर्षाच्या कालावधीत शुक्रवार पेठ व रविवार पेठ येथे घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत विजया प्रकाशचंद्र दर्डा Vijaya Prakashchandra Darda (वय-70 रा. 756 बोंबील मार्केट समोर, शुक्रवार पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पुतण्या प्रितम प्रवीणचंद्र दर्डा Pritam Pravinchandra Darda (रा. 1504 शुक्रवार पेठ, भुतकर हौदाजवळ, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रितम हे फिर्यादी विजया दर्डा यांचे पुतणे आहेत. फिर्यादी यांनी त्यांच्या घराच्या आणि कपाटाच्या चाव्या विश्वासाने त्याच्याकडे दिल्या होत्या. प्रितम याने घरातील सोन्या चांदीचे 59.5 तोळ्यांचे दागिने व 25 लाख 72 हजार 500 रुपये रोख रक्कमेचा अपहार केला.
तसेच आधर कार्ड बँक खात्याशी लिंक करायचे असल्याचे खोटे सांगितले.
फिर्य़ादी यांच्या पतीचा मोबाईल नंबरचा वापर केला.
त्यांच्या परवानगिशीवाय बँक खात्यातील 50 लाखांपेक्षा जास्त रक्कम वेगवेगळ्या प्रकारे काढून घेतली. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजया दर्डा यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करुन आरोपी प्रितम दर्डा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा