Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेकडून तीन लाखांचे ताडी बनवण्याचे रसायन जप्त, एकाला अटक

0

पुणे : – Pune Crime Branch | बनावट व रासायनिक ताडी बनवण्याचे क्लोरल हायड्रेट रसायन (Tadi Powder) गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Cell Pune) दोनने जप्त करुन एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.24) रात्री नऊच्या सुमारास केशवनगर, मुंढवा (Keshav Nagar Mundhwa) येथे करण्यात आली.

याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अंमलदार युवराज तुकाराम कांबळे (वय-33) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय-61 रा. श्रीरंग निवास, केशवनगर, मुंढवा) याला अटक केली आहे. तर आरोपीला रसायन विक्री करणारा निलेश विलास बांगर (रा. कुरकुटे वस्ती, पिंपळगाव ता. आंबेगाव) याच्यावर आयपीसी 328, 34 सह महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रल्हाद भंडारी याने आपल्या कब्जात 5 नायलॉन पोत्यामध्ये रासायनिक ताडी बनवण्याचे रसायनचा साठा करुन ठेवल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घरामध्ये रासायनिक ताडी बनविण्याचे 142 किलो 750 ग्रॅम क्लोरल हायड्रेट आढळून आले. पोलिसांनी दोन लाख 95 हजार 500 रुपयांचे रसायन जप्त केले. त्याच्याकडे रसायन बाबत चौकशी केली असता निलेश बांगर याने दिल्याचे सांगितले. पुढील तपास समाजिक सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे (API Rajesh Malegave) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.