Pune Sinhagad Road Crime | अल्पवयीन मुलांना गाडी दिल्याने पालकांवर सिंहगड रोड पोलिसांकडून गुन्हा

0

पुणे : – Pune Sinhagad Road Crime | अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यासाठी दिल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांकडून पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुलिवंदन सणानिमित्त सोमवारी (दि.25) तुकाई नगर सर्कल, सिंहगड कॉलेज रोड येथे नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) यांच्या आदेशानुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सिंहगड रोड कॉलेज रोडवर नाकाबंदी केली होती. त्यावेळी दोन मुले दुचाकी चालवताना दिसली. त्यांना आडवून विचारपूस केली असता दोघांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे व दोघेही अल्पवयीन असल्याचे दिसून आले. दोन्ही मुलांना दुचाकी चालवण्यासाठी देणाऱ्या पालक/गाडीचे मालक यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे यांनी तक्रार दिली आहे.

या कारवाईत वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार, अल्पवयीन मुलांना त्याचे वय 25 वर्षे होईपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मंजुर करु नये यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे (आरटीओ) यांना पत्र देण्यात आले आहे. याशिवाय जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यासाठी देखील आरटीओ यांना पत्र देण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 संभाजी कदम यांनी दिली.

पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना अगर वाहनाच्या मालकांनी आपले वाहन अल्पवयीन मुलांना तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवण्याकरीता ताब्यात देऊ नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करुन वाहन जप्त करुन पुढील कारवाई केली जाईल असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त प्रविण पवार (IPS Pravin Pawar), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय (PSI Suresh Jaybhaye), पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे, दिपक गबदुले, होमगार्ड सोनवणे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.