Arrest In Vehicle Theft | दुचाकी चोरट्यांना दिघी पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

0

पिंपरी : – Arrest In Vehicle Theft | दिघी परिसरात वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना दिघी पोलिसांनी (Dighi Police Station) अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख 80 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करुन चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. संतोष जयहिंद्र गुप्ता (वय-19 रा. शिंदे चाळ, खंडोबामाळ, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी एका दुचाकीवरुन दोन जण संशयित रित्या जाताना दिसले. त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला असता ते पोलिसांना पाहून पळून गेले. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने दोघांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते दुचाकी चोर असल्याचे समजले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन तर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून अॅक्टीव्हा, होंडा सीबी शाईन, ट्रीगर, पल्सर दुचाकी जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त भोसरी एमआयडीसी विभाग सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक नितीन अंभोरे, पोलीस अंमलदार पोटे, कांबळे, जाधव, काकडे, जाधव, भोसले, कांबळे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.