NCP MP Supriya Sule | भाजपा आमदाराच्या गोळीबार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, ”राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ…” (Video)

0

ठाणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – NCP MP Supriya Sule | जमिनीच्या वादातून भाजपा कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी काल रात्री उल्हासनगरच्या हिल पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभाग शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार (Ulhasnagar Firing Case) केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, या घटनेचा मी निषेध करते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्याने कुणी गोळीबार केला त्याला कडक शिक्षा व्हावी. काहीही कारण असले तरी गोळीबार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. पोलिसांच्या समोरच जर गोळीबार होत असेल तर ही सत्तेची मस्ती नाहीतर काय आहे?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, कुठेही गोळी चालवू शकतो, असे वाटत असेल तर हे गुंडाराज नाही तर काय? राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आपापसातली जी काही भांडणे असतील ती त्यांनी सोडवावीत. यामध्ये महाराष्ट्रातील सामान्य माणूस भरडला जातोय.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, गृहमंत्र्यांचे नियंत्रण उरलेले नाही. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. याबाबत आज ट्विट करणार आहे. तसेच अधिवेशनादरम्यान अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्राच्या एका पोलीस ठाण्यात सत्ताधारी आमदार गोळीबार करत असेल तर ही राज्यासाठी शरमेची बाब आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दिवसाढवळ्या, कॅमेऱ्यासमोर पोलीस ठाण्यात भांडणे होतात आणि पोलिसांसमोरच
गोळीबार करण्याची आमदाराची हिंमतच कशी होते. गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहीजे.

दरम्यान, या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.
तसेच जखमी झालेले महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : एकत्रित तपासासाठी विठ्ठल शेलारसह 7 आरोपींना पोलीस कोठडी
Pune Mundhwa Police | मौजमजेकरीता दुचाकी चोरणाऱ्याला 24 तासात मुंढवा पोलिसांकडून अटक (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.