Pune Crime News | पुणे : महिलेकडे शरीर सुखाची मागणी, पिस्टलचा धाक दाखवून घरच्यांना मारण्याची धमकी
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर पिस्टलचा धाक दाखवून घरच्यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बाणेर ते पुणे युनिवर्सिटी रोडवर (Pune University Road) अभिमानश्री हॉटेल (Abhimanshree Hotel) जवळ 27 ऑक्टोबर 2023 रोजी घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत चिंचवड येथे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) सोमवारी (दि.4) फिर्याद दिली आहे. यावरुन चंद्रकांत आनंद गाडे (Chandrakant Anand Gade) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 509, 506/2 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
फिर्यादी या आरोपीकडे कामाला आहेत. 27 ऑक्टोबर रोजी महिला अभिमानश्री हॉटेल जवळून जात असताना आरोपीने
त्यांना गाडीत ओढून घेतले. महिलेला मिठी मारण्याचा प्रयत्न करुन त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली.
त्यावेळी महिलेने त्याला विरोध केला असता आरोपीने अश्लील शिवागाळ केली.
यानंतर त्याने त्याच्या गाडीत असलेले पिस्टल (Pistol) काढून महिलेला आयुष्यातून उठवण्याची धमकी दिली.
तसेच घरच्यांना संपवून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- तरुणीला मारहाण करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी, कर्वेनगर परिसरातील घटना
- ऐतिहासिक भिडे वाडा सरकारजमा, सोमवारी रात्री 11 वाजता कडेकोट बंदोबस्तात इमारत घेतली ताब्यात
- आर्थिक देवाण घेवाणीतून खून, कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेकडून 10 तासात आरोपी गजाआड
- आताच मर्डरमधून बाहेर आलोय, दोघा गुंडांचा हॉटेलमध्ये धुडगूस
- फार्महाऊसवर पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीत मित्राचा दुसऱ्यावर चाकू हल्ला, एकाला अटक; पुण्यातील डोणजे परिसरातील घटना
- तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून, कोंढवा परिसरातील घटना