Pune Crime News | तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून, कोंढवा परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | धारदार हत्याराने तरुणाच्या गळ्यावर, पोटावर सपासप वार करुन खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि.4) सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवनेरीनगर येथील पारशी ग्राउंडवर (Parsi Ground) उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

शहानवाज उर्फ बबलू सय्यद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहानवाज याचा भाऊ समीर मुनीर सय्यद (रा. ताहिर हाईट्स, फ्लॅट नं २०३, भागोदयानगर, पुणे) याने कोंडवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि.3) रात्री साडे आठ ते सोमवारी (दि.4) सकाळी साडे दहाच्या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी सकाळी कामावर जात असताना शितल पेट्रोल पंपाजवळ त्यांचा मित्र आसिफ शेख याने सांगितले की, त्यांचा भाऊ शहानवाज उर्फ बबलू याचा पारसी ग्राउंड येथे खून झाला आहे. फिर्यादी यांनी तेथे जाऊन खात्री केली. आरोपीने फिर्याद यांच्या भावाच्या पोटावर आणि गळ्यावर धारदार हत्याराने सपासप वार करुन निर्घृण खून केला.

घटनेची माहिती मिळताच वानवडी विभागाचे (Wanwadi Division)
सहायक पोलीस आयुक्त शाहूराजे साळवे (ACP Shahuraje Salve),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior PI Santosh Sonwane),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले (PI Sandeep Bhosale), पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले
(PI Sanjay Mogle), सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात (API Sachin Thorat)
यांनी घटनास्थळी भेट दिली. कोंढवा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.