Pune Crime News | आताच मर्डरमधून बाहेर आलोय, दोघा गुंडांचा हॉटेलमध्ये धुडगूस
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | दोन वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये केलेल्या खूनात (Murder) पोलिसांना (Pune Police) मदत केली असे समजून दोघा गुंडांनी हॉटेलमध्ये शिरून धुडगूस घातला. हॉटेलमध्ये तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत भानुदास तुकाराम भोसले (रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टक्या ऊर्फ तिरुपती लष्करे (रा. पापडे वस्ती) आणि शुभम करांडे (रा. पापडे वस्ती) यांच्यावर आयपीसी 427, 352, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार भेकराईनगर येथील कानिफनाथ अमृततुल्य हॉटेलमध्ये (Amrittulya Hotel) 1 डिसेंबरला सायंकाळी सात वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल आहे. आरोपींनी 2021 मध्ये हॉटेलमध्ये खून केला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांना मदत केली असल्याचा आरोपींचा समज झाला. ते दोघे हॉटेलमध्ये शिरले. हॉटेलमधील खुर्च्या, टेबल फेकून देऊन काऊंटरची काच फोडली. हातातील लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवून फिर्यादीच्या अंगावर धावून आले. त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. तसेच टक्या याने त्याच्या हातातील शस्त्र हवेत फिरवून मी आताच मर्डरमधून बाहेर आलोय, जो कोणी माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करेल, त्याचा मी गेम करेन, अशी धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक सुशील डमरे (PSI Sushil Damre) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- फार्महाऊसवर पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीत मित्राचा दुसऱ्यावर चाकू हल्ला, एकाला अटक; पुण्यातील डोणजे परिसरातील घटना
- घरातील कुक कडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना
- एकतर्फी प्रेमातून विवाहितेला पळवून नेण्याची धमकी, वानवडी परिसरातील प्रकार
- पुणे मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलं हँडग्रेनेड, पाषाण परिसरातील प्रकार
- तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून, कोंढवा परिसरातील घटना