Pune Crime News | फार्महाऊसवर पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीत मित्राचा दुसऱ्यावर चाकू हल्ला, एकाला अटक; पुण्यातील डोणजे परिसरातील घटना

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | मुलगा झाल्याच्या आनंदातून पुण्यातील डोणजे (Donje) गावच्या हद्दीतील पायगुडेवाडी येथील एका फार्महाऊसवर मित्रांना पार्टी देण्यात आली होती. पहाटे पर्यंत चाललेल्या पार्टीत एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकूने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोणजे गावच्या हद्दीतील पायगुडेवाडी येथील निवांत फार्महाऊसवर (Nivant Farm House) घडली. (Pune Crime News)
धीरज मदन शिंदे (वय-26 रा. वडारवाडी, पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर सोमनाथ शेलार (वय-23 रा. शिवाजीनगर, पुणे) याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला वारजे परिसरातून अटक (Arrest) केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडारवाडी येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सलीम जावेद शेख याने मुलगा झाला म्हणून आपल्या चौदा ते पंधरा मित्रांना पायगुडेवाडी येथील फार्महाऊसवर पार्टीचे आयोजन केले होते. (Pune Crime News)
ही पार्टी पहाटेपर्यंत चालली. पहाटे सर्वजण शेकोटीभोवती बसले असताना आरोपी सागर आणि धीरज यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. याचा राग आल्याने सागर याने कमरेला लावलेला चाकू काढून धीरज याच्या पोटात भोसकला. यामध्ये चाकू खोलवर गेल्याने जास्त रक्तस्त्राव झाल्याने धीरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या धीरज याच्यावर ससून हॉस्पिटल (Sassoon Hospital) येथे उपचार सुरु आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार (API Sagar Pawar) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | घरातील कुक कडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना
- एकतर्फी प्रेमातून विवाहितेला पळवून नेण्याची धमकी, वानवडी परिसरातील प्रकार
- पुणे मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलं हँडग्रेनेड, पाषाण परिसरातील प्रकार
- तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून, कोंढवा परिसरातील घटना
- ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत करणारे येरवडा कारागृहाचे डॉ. संजय मरसाळे यांना अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई
- RMD Foundation | रुग्णवाहिका हि रुग्ण आणि रुग्णालय मधील महत्वाचा दुवा – शोभाताई धारीवाल