Pune Crime News | पुण्यात स्कूल बसचा भीषण अपघात, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यामध्ये एका स्कूल बसचा भीषण अपघात (Pune School Bus Accident) झाला आहे. वाघोली येथील रायझिंग स्टार या शाळेची (Rising Star School) बस झाडावर जोरदार आदळली. यामुळे बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, स्कूल बसवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. हा अपघात सकाळी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला असून घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर वेगाने स्कूल बस येऊन धडकल्याचे दिसत आहे. बसचा दरवाजाकडील भाग झाडाला धडकल्यानंतर बसची डॅशबोर्डची काच उडून समोर पडताना दिसत आहे. बसचा अपघात झाल्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांचा आरडाओरडा आणि किंकाळ्या ऐकू आल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर स्थानिक तरुणांनी तातडीन स्कूल बसच्या दिशेने धाव घेत मुलांना बाहेर काढले. काही स्थानिकांनी खिडकीमधून डोकावून रडत असलेल्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime News)
सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही.
मात्र, मुलांच्या सुरक्षेबद्दल असा बेजबाबदारपणा पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
या बसेसवर आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
आरटीओने अशा बसेसवर कारवाई करण्याची गरज असते.
परंतु पुणे आरटीओचं (Pune RTO) अशा बसेसवर कोणत्याही पद्धतीचं नियंत्रण नसल्याचा आरोप केला जात आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- पुणे : महिलेकडे शरीर सुखाची मागणी, पिस्टलचा धाक दाखवून घरच्यांना मारण्याची धमकी
- तरुणीला मारहाण करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी, कर्वेनगर परिसरातील घटना
- ऐतिहासिक भिडे वाडा सरकारजमा, सोमवारी रात्री 11 वाजता कडेकोट बंदोबस्तात इमारत घेतली ताब्यात
- आर्थिक देवाण घेवाणीतून खून, कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेकडून 10 तासात आरोपी गजाआड
- फार्महाऊसवर पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीत मित्राचा दुसऱ्यावर चाकू हल्ला, एकाला अटक; पुण्यातील डोणजे परिसरातील घटना