Ajit Pawar On Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ प्रश्नाला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, म्हणून…

0

पुणे : Ajit Pawar On Supriya Sule | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) नणंद सुप्रिया सुळे विरूद्ध भावजयी सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) अशी लढत आहे. पण, प्रत्यक्षात राजकारणात भावजयी नवखी असल्याने बहिण विरूद्ध भाऊ असाच राजकीय कलगीतुरा सातत्याने रंगत असल्याचे दिसत आहे. अजित पवार हे विविध मुद्द्यांवरून सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत आहेत. यावरून सुळे यांनी, आताच माझ्यातील वाईट गुण कसे दिसायला लागलेत, असा सवाल केला होता. त्याला आज अजित पवारांनी उत्तर दिले.

पुण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिले.

माझ्यात वाईट गुण होते तर इतके वर्ष गप्प का बसलात? या सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्ष लागली म्हणून आत्ता सगळे आठवत आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे…
अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, सतरा-आठरा वर्ष आम्ही एका संघटनेत काम केले आहे. घटस्फोट होऊन सहाच महिने झाले आहेत. पण माझ्यातले असे वाईट गुण लोक सांगत आहेत, जे मी कधी ऐकलेले पण नाहीत.

पण माझा त्यांना एक प्रश्न आहे, जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर सतरा-साडेसतरा वर्ष गप्प कशाला बसलात? असे काय झाले आहे की आता तुम्हाला हे सगळे दिसायला लागले? आत्ता माझ्या चुका का दिसत आहेत? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना विचाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.