Pune Crime News | आर्थिक देवाण घेवाणीतून खून, कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेकडून 10 तासात आरोपी गजाआड

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | कोंढवा येथील पारसी मैदानावर एका व्यक्तीचा खून (Pune Murder Case) झाल्याची घटना सोमवारी (दि.4) सकाळी साडे दहाच्या सुमारास उघडकीस आली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील तीन आरोपींना कोंढवा पोलीस (Pune Police) व गुन्हे शाखेने (Crime Branch) अटक केली आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune Crime News)

शहानवाज उर्फ बबलू मुनीर सय्यद Shahnawaz alias Bablu Munir Syed (वय-55 रा. ताहिर हाईट्स, भाग्योदय नगर, कोंढवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी जावेद खान (वय-26 रा. किंग स्टन इलेसिया सोसायटी, पिसोळी) याला अटक (Arrest) केली आहे. तर त्याचे साथीदार सद्दाम शेख व साहिल शेख यांना गुन्हे शाखा युनिट पाच च्या (Unit 5) पथकाने ताब्यात घेतले आहे. गुन्हा घडल्यानंतर दहा तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार विकास मरगळे व जयदेव भोसले यांना माहिती मिळाली की, पिसोळी भागातील एका बंद बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती काल रात्रीपासून घाबरलेल्या अवस्थेत थांबला आहे. त्याने गुन्हा केला असल्याची शक्यता आहे. तपास पथकाने पिसोळी भागातील धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या बिल्डिंच्या टेरेसवर लपून बसलेल्या जावेद खान याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने साथीदारासह आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरुन कट करुन शहानवाज याला पारशी मैदानावर (Parsi Ground) बोलावून घेतले. त्याला दारु पाजून त्याच्यावर सर्वांनी मिळून चाकुने पोटात, गळ्यावर वार करुन खून केल्याची कबुली दिली. जावेद याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले, शहानवाज याने बँकेकडून घेतलेल्या क्रेडिट कार्डच्या आर्थिक देवाण घेवाणी वरुन त्यांच्यात दोन ते तीन दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यावेळी शहानवाज याने शिवीगाळ केली होती. याच कारणावरून दोन दिवसांपासून खूनचा कट रचून रविवारी (दि.3) पारशी मैदानावर घेऊन जाऊन खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले (PI Sandeep Bhosale) करीत आहेत. गुन्ह्यातील फरार आरोपी सद्दाम व साहिल यांना युनिट पाच चे पोलीस निरीक्षक महेश बालकोटगी (PI Mahesh Balkotgi) व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग
रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त शाहुराव साळवे (ACP Shahuraje Salve),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior PI Santosh Sonwane), पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले,
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle), यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी
शिंदे (API Lekhaji Shinde), सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील (API Dinesh Patil) पोलीस अंमलदार अमोल हिरवे,
जयदेव भोसले, विकास मरगळे, निलेश देसाई, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत रत्नपारखी, शशांक खाडे, आशिष गरुड,
राहुल वंजारी, रोहित पाटील यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.