RMD Foundation | रुग्णवाहिका हि रुग्ण आणि रुग्णालय मधील महत्वाचा दुवा – शोभाताई धारीवाल

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – RMD Foundation | आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर वेळेवर उपचार मिळाला तर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. अशा परिस्थितीत रुग्णास वेळेवर रुग्णवाहिकेची मदत मिळाली तर ती रुग्ण आणि रुग्णालयामधील जीवरक्षक दुवा असते, असे मत आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारीवाल (Shobha Rasiklal Dhariwal) यांनी व्यक्त केले. आरएमडी फाऊंडेशनच्या निधीतून श्री अष्टविनायक मित्रमंडळ विश्रांतवाडी (Vishrantwadi) या गणपती मंडळास रुग्णवाहिका देण्यात आली. त्यावेळी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या वेळी त्या बोलत होत्या. (RMD Foundation)
आरएमडी फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पर्यावरण व आरोग्य सेवेबाबत मागील २० वर्षांपासून कार्यरत असल्याचे तसेच शाकाहार हा ऊत्तम आहार याबाबत मी नेहमीच विविध कार्यक्रमातून प्रसार व प्रचार करते, शाकाहारी होण्याची लाज नसावी तर अभिमान असावा असे जाहीर आवाहनही यावेळी त्यांनी उपस्थितांना केले. (RMD Foundation)
रसिकशेठ धारीवाल यांच्या देणगीने संपूर्ण देशभर अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यात आले. तीच प्रथा यापुढे शोभाताई चालवित आहे असे मत बापू पठारे यांनी व्यक्त केले. रुग्णवाहिकेमुळे विश्रांतवाडी, येरवडा व आजूबाजूच्या परिसरातील गरजू रुग्णास नक्कीच मदत मिळेल अशी भावना यावेळी ॲड. भगवान जाधव यांनी व्यक्त केली. श्री अष्टविनायक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेची प्रतिकृती, शाल व श्रीफळ देऊन शोभाताई धारीवाल यांचा सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर शिरीष मोहिते, अनिल टिंगरे, मंगला मंत्री,
अर्जुन भैय्या जगताप, विशाल टिंगरे, डॉ रसिक शेटीया, दिलीप पवार, कर्नल तृप्ती देशपांडे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, सुहास बोरा, ॲड. संकेत बोरा, दिलीप पाटील,
अष्टविनायक मित्र मंडळाचे राहुल जाधव, अभिजीत कदम व पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
- Pune Crime News | पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार
- Raj Thackeray Meet CM Eknath Shinde | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय चर्चांना उधाण!
- Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…
- Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!