Pune Crime News | घरातील कुक कडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | घरत कुक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग (Molestation) केला आहे. याप्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत उंड्री येथे घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली. यावरून रणजित कुमार दिनेश मंडल (रा. कडनगर, उंड्री) याच्यावर आयपीसी 354, 506, सह पोक्सो कलम 8, 10, 12 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.(Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंडल फिर्यादी यांच्या घरात कुक (Cook) म्हणून काम करतो. आरोपीने फिर्यादी यांच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. तसेच बाबांना सांगितले तर तुला बघुन घेईन अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत आईला सांगितले. पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील (API Dinesh Kumar Patil) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- एकतर्फी प्रेमातून विवाहितेला पळवून नेण्याची धमकी, वानवडी परिसरातील प्रकार
- पुणे मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलं हँडग्रेनेड, पाषाण परिसरातील प्रकार
- तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून, कोंढवा परिसरातील घटना
- रुग्णवाहिका हि रुग्ण आणि रुग्णालय मधील महत्वाचा दुवा – शोभाताई धारीवाल
- पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार
- यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार
- Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…
- Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!