ACB Trap News | एक लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
![ACB Trap](https://i0.wp.com/npnews24.com/marathi/wp-content/uploads/sites/2/2023/11/ACB-Trap-9.jpg?resize=640%2C360&ssl=1)
नाशिक : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – ACB Trap News | ठेकेदाराने केलेल्या कामाचे देयकाची रक्कम ग्रामपंचायत कडून मंजुर करण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोलीच्या ग्रामसेवकाने त्यांच्याकडे 1 लाख 4 हजार रुपयांची लाच मागितली. ही रक्कम स्वीकारताना (Accepting Bribe) ग्रामसेवकाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. अनिलकुमार मनोहर सुपे Anil Kumar Manohar Supe (वय- 46) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. नाशिक एसीबीने ही कारवाई गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) नाशिक शहरात केली. (ACB Trap News)
याप्रकरणी 36 वर्षीय ठेकेदाराने नाशिक एसीबीकडे (Nashik ACB) 29 नोव्हेंबर रोजी तक्रार केली आहे. तक्रारदार हे ठेकेदार (Contractor) आहेत. त्यांनी वाढोली ग्रामपंच्यातीच्या हद्दीतील गावातील विविध कामे घेतली होती. ही कामे तक्रारदार यांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण केली. यापैकी काही देयकांची रक्कम ग्रामपंचायतकडून तक्रारदार यांना मिळाली आहे. मात्र, काही कामाच्या देयकाची रक्कम 2 लाख 99 हजार 776 रुपये मिळालेले नाहीत. याबाबत तक्रारदार यांनी ग्रामसेवक (Gram Sevak) सुपे यांच्याकडे विचारणा केली. हे देयक मंजुर करण्यासाठी 30 हजार रुपये व यापुर्वी तक्रारदाराने केलेल्या कामाचे देयके मंजुर केलेले आहेत, यासाठी बक्षीस म्हणून 70 हजार रुपये व सर्व देयकांचे ऑडिट करण्याचे 4 हजार रुपये असे एकूण 1 लाख 4 हजार रुपयांची लाच अनिलकुमार सुपे यांनी 29 नोव्हेंबर रोजी मागितली. (ACB Trap News)
याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता
ग्रामसेवक अनिलकुमार सुपे यांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार गुरुवारी सायंकाळी सापळा लावण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 1 लाख रुपये लाच स्वीकारताना सुपे
याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलिमा केशव डोळस (PI Neelima Keshav Dolas),
पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलिस नाईक प्रभाकर गवळी, पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा