Pune Police MPDA Action | लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 63 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MPDA Action | लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार विवेक उर्फ विकी चंद्रकांत तेलंग Vivek alias Vicky Chandrakanth Telang (वय 26 रा. भराडी चाळ, लोणी काळभोर, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 63 वी कारवाई आहे.
विकी तलंग लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार (Criminals On Pune Police Records) आहे. त्याने साथीदारांसह हडपसर (Hadapsar Police Station) व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, लाकडी दांडके या सारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्याविरुद्द खंडणी (Extortion), विनयभंग (Molestation), दुखापत, चोरी यासरखे 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे. तसेच त्याच्यापासून जीवाला आणि मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार देण्यास धजावत नव्हते.
आरोपी विवेक उर्फ विकी तेलंग याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण
(Sr PI Shashikant Chavan) यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पाठवला होता.
प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपीला एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत (MPDA Act)
नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे
(Sr PI Chandrakant Bedre), पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Motion Sickness Remedies | तुम्हाला सुद्धा प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय करा..
- Cracked Heels Remedies | टाचांना खूप भेगा पडल्या? मऊ मुलायम टाचांसाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
- Pune Water Supply | पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये कमी पाणीसाठा