Pune Crime News | लग्न करण्याची मागणी करत महिलेचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल; कोंढवा परिसरातील घटना

Molestation Case

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) लग्न करण्याची मागणी करत महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग (Molestation Case) केला. ही घटना कोंढवा परिसरातील टिळेकर नगर येथे शुक्रवारी (दि.24) रात्री अकराच्या सुमारास पीडित महिलेच्या घरात घडली. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत 40 वर्षीय पीडित महिलेने रविवारी (दि.26) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन भिमराव सुग्रीव देवमुंढे Bhimrao Sugriva Deomundhe (वय-29 रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. शुक्रवारी रात्री महिला तिच्या घरामध्ये असताना रात्री अकराच्या सुमारास आरोपी घरी आला. त्याने जबरदस्तीने महिलेच्या घरात घसुन ‘तु मला खुप आवडते, आपण दोघे लग्न करु, मी कोणास काही सांगणार नाही’ असे बोलून महिलेसोबत गैरवर्तन केले. पिडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्य़ाद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार (PSI Birajdar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा