Pune Accident News | पुणे नगर रस्त्यावर टँकर उलटून वायुगळती

Pune Accident News

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन –  Pune Accident News | पुणे नगर रस्त्यावर (Pune Nagar Road) वडगाव शेरी चौकाजवळ टँकर उलटून मोठ्या प्रमाणात वायुगळती (इथिलीन ऑक्साइड – Ethylene Oxide) झाली. पीएमआरडीए (PMRDA) आणि पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) अग्निशमन दलाचे (Fire Brigade) ८ बंव घटनास्थळी दाखल झाले. वायुगळती थांबवण्याचे काम सुरु आहे.(Pune Accident News)

नगर रोडवरील रामवाडी येथे बीआरटीच्या सीमाभिंतीला एक टँकर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास धडकला. त्यामुळे तो उलटल्याने त्यातून वायूगळती सुरु झाली. टँकरमधून ईथलिन ऑक्साईड वायू बाहेर येत असल्याने आग आणि स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान सातत्याने या टँकरवर पाण्याचा मारा करीत आहेत. गेल्या ९ तासांहून अधिक काळ पाण्याचा मारा सुरु आहे. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीचे तंत्रज्ञ येथे पोहोचेपर्यंत टँकरवर पाण्याचा मारा करण्यात येत आहे. नगर रस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा