Pune Crime News | पुणे : मेडिकल प्रवेशाच्या आमिषाने 27 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | वैद्यकीय शिक्षणासाठी (Medical Education) एनआरआय कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 27 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 ते रविवार (दि.26 नोव्हेंबर) या कालावधीत अनिल देवगिरी यांचे घरी व सिंहगड रोडवरील सिंहगड इन्स्टीट्युट (Sinhagad Institute) च्या ऑफिस मध्ये घडला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
जयेश शिंदे, पवन सूर्यवंशी (रा. चिखली) आणि राहुल तुपेरे यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्र खंडेराव देशमुख (वय 59, रा. वसंत कमल विहार सोसायटी, दत्त दिगंबर कॉलनी, आंबेडकर चौकाजवळ, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र देशमुख यांच्या मुलीला मेडिकलला अॅडमिशन हवे होते. आरोपी पवन सुर्यवंशी याने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधुन मुलीचे मेडिकल अॅडमिशन करुन देतो असे सांगितले. त्यानंतर त्याने जयेश शिंदे याच्यासोबत फिर्यादी यांची ओळख करुन दिली. जयेश शिंदे याने एनआरआय कोट्यातुन मुलीचे अॅडमिशन करुन देतो असे सांगून फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 27 लाख 26 हजार रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात घेतले. मात्र, त्यांच्या मुलीचे अॅडमिशन केले नाही. (Pune Crime News)
त्यामुळे फिर्यादी यांनी अॅडमिशन करण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले. आरोपींनी पैसे परत न करता महेंद्र देशमुख
यांची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात
तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी रविवारी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा