Pune Crime News | खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना कोंढवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक, 4 महिन्यांपासून होते फरार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | फेब्रिकेशनच्या व्यवसायातून झालेल्या वादातून सख्या मावस भावाचा लाकडी बांबूने डोक्यात मारहाण (Beating) करुन खून (Murder Case) करुन फरार झालेल्या आरोपींना कोंढवा पोलिसांनी (Pune Police) उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. कोंढवा पोलीस मागील चार महिन्यांपासून आरोपींचा शोध घेत होते. अखेर उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. (Pune Crime News)

तनवीर हबीब खान व सरफराज उर्फ टारजन हबीब खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) आयपीसी 302, 324, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रिकेशनच्या व्यवसायातून झालेल्या वादातून आरोपींनी फिर्य़ादी यांना लाकडी बांबूने डोक्यात मारुन जखमी केले. हा वाद सोडवण्यासाठी मयत व्यक्ती गेला असता त्याला देखील आरोपींनी डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. त्याच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते.

कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाने आरोपींचे मोबाईल नंबरच्या सीडीआर व एसडीआर च्या सहाय्याने त्यांचा मुळ पत्ता प्राप्त केला. त्यावेळी आरोपी हे नाहरिया जि. रायबरेली येथील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे एक पथक नाहरीया येथे गेले. हे ठिकाण मिलएरिया पोलीस ठाण्याच्या (Milarea Police Station) हद्दीत येत असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींचा शोध घेत असताना आरोपी तनवीर खान हा पोलिसांना पाहून जंगलात पळून गेला. रात्र झाल्याने पोलिसांनी जंगलाच्या बाहेर रात्रभर पहारा दिला. पहाटेच्या सुमारास आरोपी जंगलातून बाहेर आला. पोलिसांना पाहून पुन्हा पळून जात असताना पोलिसांनी सिने स्टाईल त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. ( Pune Crime News)

तनवीर खान याच्याकडे सरफराज खान बाबत चौकशी केली असता तो हिलगी येथे असल्याची माहिती दिली. पोलीस पथकाने हिलगी येथे जाऊन सरफराज उर्फ टारजन खान याला ताब्यात घेऊन कोंढवा पोलीस ठाण्यात आणून अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक राजेश उसगांवकर (PI Rajesh Usgaonkar) करीत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 29 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (IPS Vikrant Deshkumkh),
सहायक पोलीस आयुक्त शाहुराव साळवे (ACP Shahurao Salve),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonwane), पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले (PI Sandeep Bhosale),
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, पोलीस अंमलदार मिसाळ, महानवर यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.