Pune Crime News | पुणे : लग्नास नकार दिल्याने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल, एकावर गुन्हा दाखल
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका 20 वर्षाच्या तरुणीचे खासगी फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार पुण्यातील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलिसांत (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते 14 नोव्हेंबर 2023 दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत 20 वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र रामुलु पागे Ravindra Ramulu Page (रा. सिरोंचा, गडचिरोली) याच्यावर आयपीसी 354 ड, 500, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र पागे आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाची मागणी घातली होती.
मात्र, तिने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिला वारंवार फोन करुन लग्नाची मागणी घातली.
लग्न केले नाही तर इतर कोणासोबत लग्न होऊ देणार नसल्याची धमकी दिली.
तसेच दोघांचे खाजगी फोटो तरुणीच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी करुन
स्त्री मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल केकाण (PSI Anil Kekan) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Police MPDA Action | कोंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 56 वी स्थानबध्दतेची कारवाई
- Ind vs New | वनडेमध्ये शतकांचे अर्धशतक! जगातील पहिला खेळाडू बनला कोहली, तेंडूलकरला सुद्धा टाकले मागे
- Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्माचा षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड! क्रिस गेलला टाकले मागे, Video
- ACB Trap News | लाच स्वीकारताना पोलीस हवालदार व झिरो पोलीस अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!
- Benefits Of Fruits | ‘या’ 5 फळांचा समावेश करा रोजच्या आहारात, होतील अनेक फायदे…