Ravindra Dhangekar | पुण्यातील शिख बांधवांचा रवींद्र धंगेकरांना पाठींबा

0

पुणे : पुण्यातील शिख समाजातील (Sikh Community Pune) प्रमुख व्यक्तींची बैठक काँग्रेस भवन (Pune Congress Bhavan) येथे पार पडली. गणेशपेठ गुरुद्वाराचे (Ganesh Peth Gurudwara) अध्यक्ष भोलासिंग आरोरा, रणजितसिंग आरोरा, रमिंदरसिंग राजपाल, गुरवेंदरसिंग राजपाल (युथ गुरुनानक फाउंडेशन अध्यक्ष), ( ह्युमन राईटसचे) ललितसिंग डीडी, यांच्या पुढाकाराने आयोजत या बैठकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे (India Aghadi) काँग्रेस पक्षाचे (Congress Candidate) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार (Ulhas Pawar) बैठकीच्या अध्यक्ष स्थानी होते.

संविधान संरक्षण आणि अल्पसंख्यांक समाजाला आधार हे दोन्ही मुद्दे महत्वाचे असून त्यामुळेच महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठींबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे गणेशपेठ गुरुद्वाराचे अध्यक्ष भोलासिंग आरोरा यांनी सांगितले.

सुरेंदरसिंग गुरुदत्ता (सेक्रेटरी गुरुनानक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज), गुरप्रीतसिंग शर्मा (प्रमुख व्यावसायिक दिल्ली केटरर्स), सनीसिंग व्होरा (रेस्टॉरंट अँड बार बॉडी ट्रस्टी), विरमितसिंग मैनी (पुना फोर व्हीलर ऑटो इंडस्ट्री अध्यक्ष), हडपसर भाग प्रमुख शिख नेते बच्चनसिंग कल्याणी, आझादसिंग बच्चूसिंग टाक (हडपसर गुरुद्वारा ट्रस्टी), नवनीतसिंग गांधी (काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे सचिव), अभिजित वंजारी (नागपूरचे आमदार), आम आदमी पार्टीचे अध्यक्ष मुकुंद किर्दत, गोपाळ तिवारी ( काँग्रेस पक्ष राज्य प्रवक्ते), अजित अभ्यंकर (मार्सवादी कम्युनिस्ट पक्ष), सिव्हील सोसायटीचे संदीप बर्वे आणि रेश्मा, प्रीती चढ्ढा (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व्यापार सेल) व (युवती प्रदेश सरचिटणीस) सुखमित कौर अरोरा आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.