Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीसोबत लग्न… पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Chaturshringi Police Station

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीसोबत लग्न (Minor Girl Marriage) करुन तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यात ती गरोदर राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीचा पती सासु-सासरे, आई-वडिल यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार काळाखडक, हिंजवडी व गायकवाड वस्ती औंध येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीने (वय-18) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू-सासरे, आई-वडिल यांच्यावर आयपीसी 376, 376/2/एन सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो), बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 17 वर्षाची असताना तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न लावले. ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपी पतीने तिच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर आरोपी पतीने तिच्याशी शाररिक संबंध ठेवल्यामुळे ती गरोदर राहिली. नऊ महिने भरल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

औंध जिल्हा रुग्णालयामध्ये तिची प्रसूती झाली.
तिच्या वयाची कागदपत्रे तपासली असता मुलगी अल्पवयीन असताना तिचे लग्न केल्याचे समोर आले.
त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मिरा चव्हाण (PSI Mira Chavan) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा