ACB Trap News | लाच स्वीकारताना पोलीस हवालदार व झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Police Constable Pramod Kamble Bribe Case

सोलापूर : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – ACB Trap News | गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी दहा हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाणे (Solapur MIDC Police Station) अंतर्गत नई जिंदगी पोलीस चौकीतील पोलीस हवालदारासह झिरो पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur ACB Trap) सापळा रचून अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.13) सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

पोलीस हवालदार प्रमोद कांबळे (Police Constable Pramod Kamble) व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे (Zero Police Nagnath Kaluram Alkunte) अशी लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोन गटात तक्रार झाली होती या तक्रारीचा तपास पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे होता. त्यातील एका गटाला सहकार्य करण्याच्या अटीवर कांबळे याने वीस हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदार याने यासंदर्भात सोलापूर एसीबीकडे तक्रार केली. पथकाने सोमवारी पडताळणी करुन सायंकाळी सापळा लावला.
पोलीस हवालदार कांबळे यांच्यावतीने तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच घेताना
झिरो पोलीस अलकुंटे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलीस हवालदार कांबळे याला ताब्यात घेतले.
दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.