Ind vs New | वनडेमध्ये शतकांचे अर्धशतक! जगातील पहिला खेळाडू बनला कोहली, तेंडूलकरला सुद्धा टाकले मागे

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Ind vs New | विराट कोहलीने (Virat Kohli) मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium Mumbai) ऐतिहासिक खेळी करत वर्ल्ड कप २०२३ च्या (ICC World Cup 2023) सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्ध शतक ठोकले. या शतकासह कोहलीने वनडेमध्ये सर्वात जास्त शतक करणाऱ्या सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडला. कोहलीने १०६ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले. हे कोहलीचे वनडेचे ५०वे शतक ठरले आणि तो एकदिवसीय प्रकारात ५० शतक करणारा पहिला फलंदाज बनला. (Ind vs New)

माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडूलकरने आपल्या कारकिर्दीत ४९ वनडे शतकं केली होती. परंतु, आता कोहलीने त्याचा विक्रम मोडला आहे. तेंडूलकरने आपल्या कारकिर्दीत ४६३ वनडे सामने खेळले. तर कोहली आपला २९१वा एकदिवसीय सामना खेळत आहे. याशिवाय कोहलीने वल्र्ड कपच्या एका एडीशनमध्ये सर्वात जास्त धावा बनवण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला. यामध्ये सुद्धा त्याने सचिन तेंडूलकरला मागे टाकले.

विराटचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले ८० वे शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या नावावर २९ तर २०-२० प्रकारात एका शतकाची नोंद आहे. २००९ मध्ये विराटने वनडे कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले होते.
१४ वर्षानंतर विराटने वनडे शतकांचे अर्धशतक पूर्ण केले आहे.
विराटचे वनडेतील न्यूझीलंडविरुद्धचे हे सहावे शतक आहे.
मायदेशातील कोहलीचे हे २२वे शतक आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी ७१ धावा केल्यावर
रोहित बाद झाला. यानंतर विराटने डावाला सावकाश सुरुवात केली.
उकाड्यामुळे विराटला क्रॅम्प्सचा त्रास जाणवला मात्र तो एकाग्रतेने खेळला. (Ind vs New)

विराटने ९ चौकार आणि २ षटकारांसह ११७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली.
विराटने शुबमन गिलच्या सोबत ८६ चेंडूत ९३ धावांची भागीदारी केली.
दुखापतीमुळे गिल तंबूत गेल्यावर
विराटने श्रेयस अय्यरच्या साथीने १२८ चेंडूत १६३ धावांची भागीदारी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.