Vinod Solanki Join BJP | विनोद सोळंकी यांची काँग्रेसला सोडचिट्ठी, कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

0

पुणे : Vinod Solanki Join BJP | काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष विनोद सोळंकी यांनी पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत पुणे येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विनोद सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे नियुक्तीपत्र भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व भाजपा जैन प्रकोष्टचे प्रदेशाध्यक्ष संदीपदादा भंडारी यांच्या नेतृत्वात हे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी भाजपा जैन प्रकोष्ट पुणे शहराध्यक्ष महेंद्र सुदेचा. प्रवीण चोरबोले. निमेष शहा. प्रकाश बोरा. प्रवीण ओसवाल. स्वाती शिंदे. राजश्री शिळीमकर. कविता वैरागे. राजेंद्र भाटिया. अनिल भन्साळी. बाळासाहेब कटारिया. पुणे शहर युवक अध्यक्ष मयूर सरनोट. प्रकाश बाफना. आदि यावेळी उपस्थित होते.
विनोद सोळंकी हे गेली तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक उपाध्यक्षपदी तसेच त्यांनी काँग्रेस पक्षात महाराष्ट्र स्तरावर अनेक पदांवर काम केले

Leave A Reply

Your email address will not be published.