Benefits Of Fruits | ‘या’ 5 फळांचा समावेश करा रोजच्या आहारात, होतील अनेक फायदे…

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन  टीम – फळे आराग्यासाठी अत्यंत चांगले असतात. फळांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे (Benefits Of Fruits). फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात. जीवनसत्वं तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात. तुम्हाला ताप (Fever) येत असेल, तर अनेकदा फळे खाल्ल्याने ही ताप नाहीसा होतो (Healthy Fruits). ताप हा कमी प्रतिकारशक्ती असल्यामुळे येतो, परंतु जर तुम्ही निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक गोष्टींचे सेवन केलं, तर तुमची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) चांगली राहते. तुम्ही रोगापासून मुक्त होण्यास मदत होते (Benefits Of Fruits). जाणून घेउया काही फळांबद्दल जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

१) संत्री (Orange)–

नियमित संत्र्याचं सेवन करावे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी (Vitamin C) शरीराला हायड्रेट करते. तसेच त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. रोज दोन ते तीन संत्री खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

२) किवी (Kiwi)-

किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते. किवीमध्ये पोटॅ शियमचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे याचे सेवन केल्यानं तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते (Immunity Boost). यामुळे बीपी (BP) नियंत्रणात राहतो.

३) लिंबू (Lemon)–

नियमितपणे आहारात लिंबाच्या रसाचा समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. लिंबू रोगप्रतिकारशक्ती वाढवते. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून तुम्ही पिऊ शकतात.

४) आंबा (Mango)–

आंब्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. मात्र जास्त फायबर
असल्यामुळे आंबा पचण्यास कठीण असतो. आंबा तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर आहेत (Benefits Of Fruits).

५) स्ट्रोबेरी (Strawberry)–

तुमच्या आहारात स्ट्रॉबेरीचाही समावेश करू शकता. स्ट्रोबेरीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.
त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. स्ट्रोबेरीचा रससुद्दा आरोग्यास चांगला असतो (Healthy Diet).

Leave A Reply

Your email address will not be published.