Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 55 वी स्थानबध्दतेची कारवाई

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MPDA Action | खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार (Criminals On Pune Police Records) नजीर सलीम शेख (वय- 29 रा. हनुमान मंदिराजवळ, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 55 वी कारवाई आहे.

आरोपी नजीर शेख याच्यावर खडक पोलीस ठाण्यात 2019 पासून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill), मारामारी, घातक हत्यार बाळगणे, जबरी चोरी, धमकी देणे, सामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण, व्यापारी व बिल्डर यांना खंडणी मागणे, दहशत निर्माण करणे यासारखे 5 गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवाईंना आळा घालण्यासाठी 2023 मध्ये त्याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर देखील त्याने गुन्हे केले आहेत.

खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने (Sr PI Sunil Mane) यांनी आरोपी नजीर शेख याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त यांच्याकडे सादर केला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपीला एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत (Pune Police MPDA Action)
अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने व पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे यांनी केली.
पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 55 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी
प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.