Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीला बलात्कार करण्याची धमकी, दोन महिलांसह तिघांना अटक

0

पुणे : – Pune Crime News | पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिघांनी घरात घुसून शिवीगाळ केली. तसेच तुझ्यावर बलात्कार करेन अशी धमकी (Threatened To Rape) देऊन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshrungi Police Station) हद्दीत 14 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांवर पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पिडीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने रविवारी (दि.19) चतु; श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार सुरेखा कोमरेकर, काजल अलकुंटे, प्रदीप बाबू अलकुंटे (तिघे रा. जनवाडी जनता वसाहत) यांच्यावर आयपीसी 354, 504, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता पिडीत मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी फिर्य़ादी यांच्या घरात आले. त्यांनी मुलीला अश्लील शिवीगाळ केली. तर आरोपी प्रदीप याने घराच्या खिडकीतून हात घालून मुलीचा हात पकडला. तिच्यासोबत अश्लिल वर्तन करुन बलात्कार करण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे करीत आहेत.

भररस्त्यात तरुणीचा विनयभंग

हडपसर : रस्त्याने जाणाऱ्या तरुणीची छेड काढून तिच्याकडे शरीर संबंधाची (Physical Relationship) मागणी केली. तसेच तिचा हात धरुन असभ्य वर्तन करुन विनयभंग केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 29 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन मंजुनाथ नागेश माने Manjunath Nagesh Mane (वय-26 रा. हडपसर), आकाश दत्तात्रय भारती Aakash Dattatreya Bharti (वय-25 रा. मांजरी) यांच्यावर आयपीसी 354, 354(अ), 509, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.18) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी (PSI Suvarna Gosavi) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.