Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : बनावट दस्त करुन कंपनीची व शासनाची फसवणूक, दोघांवर FIR

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | बनावट दस्त (Fake Documents) करुन एका खासगी कंपनीची व शासनाची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 12 मे 2023 रोजी दिघी येथे घडला आहे. याप्रकरणी दोघांवर दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी मूळ दस्तामध्ये अफरातफर करुन बनावट दस्त केला.

याप्रकरणी रोशन प्रफुल तालेरा (वय 35, रा. तालेरा नगर, आळंदी रोड, दिघी मुळ रा. डॉ. कोयाजी रोड, कॅम्प पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप प्रल्हाद बाविस्कर Pradeep Prahlad Baviskar (रा. दिघी) आणि उर्मिला महादेव कळमकर
Urmila Mahadev Kalamkar (रा. शास्त्री चौक, भोसरी, पुणे) यांच्या विरोधात आयपीसी 420, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 1994 मध्ये मूळ दस्तामध्ये स्वतःच्या फायद्याकरिता अफरातफर केली. तसेच बेकायदेशीरपणे बनावट दस्त तयार करून दिघी येथील तलाठी कार्यालयात सादर केला. यामध्ये आरोपींनी फिर्यादी यांची कंपनी डायनामिक लॉजिस्टिक्स (Dynamic Logistics) आणि शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.एम. शिंगारे करीत आहेत.

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

वाकड : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक (Investment In Share Market) करण्यास सांगून सायबर चोरट्यांनी एका महिलीची तब्बल 18 लाख 23 हजार 500 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी 56 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलिसांनी सायबर चोरट्यांवर आयपीसी 406, 419, 420 सह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 25 जानेवारी 2024 रोजी घडला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे (PI Ravikiran Nale) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.