Mundhwa Pune Crime News | पुणे : पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

0

पुणे : – Mundhwa Pune Crime News | पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका व्यक्तीने पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा भागात घडली (Attempt To Suicide). आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सौदागर उत्तम काकडे (वय-51 रा. केशवनगर, मुंढवा) याच्याविरुद्ध आयपीसी 309, 285, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.19) दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक महादेव हरिबा लिंगे (वय-42) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. सौदागर काकडे आणि त्याच्या पत्नीत वाद झाले होते. सौदागरला दारुचे व्यसन असल्याने त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. याबाबत सौदागर याने मुंढवा पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, पत्नीने स्वत: पोलीस ठाण्यात येऊन पती दारु पिवून त्रास देत असल्याने त्याच्यासोबत जायच नसल्याचे सांगितले होते. पत्नी नांदायला येत नसल्याने सौदागर चिडला होता. तो वारंवार पोलीस ठाण्यात येऊन पत्नीला शोधून तिला माझ्यासोबत पाठवा असे म्हणून त्याने पोलिसांना आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली.

मुंढवा पोलिसांनी आरोपी सौदागर आणि त्याच्या पत्नीला रविवारी (दि.19) पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी देखील पत्नीने आरोपी सोबत जाण्यास नकार दिला. याचा राग आल्याने सौदागर याने पत्नीला बडबड व शिवीगाळ करुन पोलीस ठाण्यातून बाहेर गेला. पोलीस ठाण्याच्या आवारात त्याच्या गाडीच्या डिकीतून पेट्रोलची बाटली काढून अंगावार ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे, सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब टापरे, पोलीस शिपाई कोकणे महिला पोलीस नाईक जाधव, भोसूरे यांनी धाव घेत आरोपीच्या हातातून पेट्रोलची बाटली काढून घेतली. सौदागर काकडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.