Ganj Peth Pune Crime News | प्रेयसीने संपर्क तोडला, प्रियकराचा प्रेयसीच्या घराबाहेर गोळीबार; पुण्यातील धक्कादयक घटना

0

पुणे : – Ganj Peth Pune Crime News | पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना घडत आहेत (Firing In Pune). अशीच एक घटना रविवारी (दि.19) मध्य रात्री दोनच्या सुमारास गंजपेठेत घडली आहे (Firing In Ganj Peth). प्रेयसीने संपर्क तोडल्याच्या रागातून तरुणाने तिच्या घराबाहेर गोळीबार केला. या घटनेत प्रेयसीची बहिण जखमी झाली असून तिच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) प्रियकर ऋषी बागुल (रा. गंजपेठ, पुणे) आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा घटस्फोट झाला असून तिचे आणि आरोपी ऋषी बागुल यांच्यात प्रेम संबंध आहेत. त्या दोघांमध्ये वाद झाल्याने फिर्य़ादी यांच्या बहिणीने ऋषीचा फोन ब्लॉक करुन त्याच्यासोबत संपर्क करणे टाळले. तसेच ती भेटत नसल्यामुळे ऋषीला राग अनावर झाला. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास तो प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्यावेळी प्रेयसीच्या बहिणीसोबत त्याचे वाद सुरु झाले.

प्रेयसी भेटत नसल्याचा राग मनात धरुन त्याने त्याच्याकडील पिस्टल प्रेयसीच्या बहिणीवर रोखून जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. मला जर ती मिळाली नाही तर मी कोणाला सोडणार नाही, अशी धमकी त्याने यावेळी दिली. तसेच त्याने प्रेयसीच्या राहत्या घराला बाहेरुन कडी लावून दोघे निघुन गेले.

दरम्यान, फिर्यादी यांनी 112 क्रमांकवर संपर्क करुन पोलिसांकडे मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी फिर्यादी यांच्या जखमी बहिणीला महिला पोलिसांसोबत ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. खडक पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.