Ebrahim Raisi Helicopter Crash | इराणच्या अध्यक्षांचे हेलिकॉप्टर अपघतात निधन, खराब हवामान आणि घनदाट धुक्यामुळे घडली दुर्घटना

तेहराण : Ebrahim Raisi Helicopter Crash | इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचे हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात निधन झाले आहे (Iran President Raisi Death). अपघातग्रस्त हेलिकॉप्टर युद्धपातळीवर शोध घेतला असता ते अजरबैजानमध्ये जंगलात सापडले. अपघातात हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला आहे. दाट धुके, खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते.
इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असताना पूर्व अजरबैजानमध्ये जंगलात हेलिकॉप्टर कोसळले. घटनास्थळ हे जबरीजपासून साधारण १०० किमीच्या अंतरावर आहे. हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, ते दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात रईसी यांचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे.
रईसी यांच्यासह परराष्ट्रमंत्री हुसैन अमिर अब्दुल्लाहिआन हे देखील या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र या दुर्घटनेत कोणताही प्रवासी बचावण्याची शक्यता कमी.
इराणमधील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरची स्थिती पाहता या अपघातात अन्य प्रवाशी बचावण्याची शक्यता कमी आहे. तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी म्हटले आहे की, या अपघाताचा देशाच्या कारभारावर परिणाम पडणार नाही.