Pune Crime News | फटाके फोडण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, सुरक्षा रक्षकाला अटक; कल्याणीनगर मधील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | आई-वडिलांसोबत फटाके फोडण्यासाठी गेलेल्या साडेनऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग (Minor Girl Molestation Case) केल्याची घटना पुण्यातील कल्याणीनगर भागात घडली आहे. याप्रकरणी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला (Security Guard) येरवडा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.11) रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार सुरक्षा रक्षक विठ्ठल रावळ कांबळे Vitthal Rawal Kamble (वय-42 रा. लमाण वस्ती, येरवडा) याच्यावर आयपीसी 354 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कल्याणीनगर येथील एका सोसायटीत राहात असून त्या सोसायटीमध्ये आरोपी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. शनिवारी रात्री पीडित मुलगी तिच्या आई-वडिल व मैत्रिणी सोबत सोसायटीच्या गेटवर फटाके फोडण्यासाठी गेली होती.
त्यावेळी आरोपी विठ्ठल कांबळे यांनी फिर्यादी यांच्या मुलीसोबत गैरवर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
हा प्रकार लक्षात येताच पीडित मुलीच्या आईने येरवाड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गाताडे (PSI Gatade) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.