Ration Card | रेशन कार्डवर दरवर्षी मिळणार एक साडी मोफत, २४ लाख कुटुंबांना लाभ

Ration Card

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Ration Card | राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या (State Govt) वस्त्रोद्योग विभागाने (Textiles Department) हा निर्णय घेतला आहे. शासनाने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी साडी वाटप होईल. राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या २४ लाख ५८ हजार ७४७ आहे. या सर्व कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक साडी मोफत मिळणार आहे. (Ration Card)

राज्य यंत्रमाग महामंडळ ही योजना राबवणार असून २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे. योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमालीचा खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे. (Ration Card)

वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा