Pune Fire News | लक्ष्मीपूजनाच्या आतषबाजीमुळे पुण्यात 27 ठिकाणी आगीच्या घटना
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Fire News | रविवारी पुणे शहरामध्ये तसेच उपनगरामध्ये लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. या फटाक्यांमुळे शहरातील वेगवेगळ्या भागात 27 ठिकणी आग लागली. परंतु, अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ( Pune Fire News)
रविवारी सायंकाळी साडेसातनंतर व्यापारी पेठेसह शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. त्यामुळे घराच्या छतावर साठलेला पालापाचोळा, तसेच झाडांना आग लागण्याच्या घटना घडतात. अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षात नागरिकांनी आग लागल्याची तक्ररी नोंदविल्या. रविवारी सायंकाळी 7.38 ते रात्री 10.52 पर्यंत आगीच्या 23 घटना घडल्या. तर रात्री 12.00 नंतर चार घटना घडल्या. ( Pune Fire News)
लक्ष्मीपूजन आगीच्या घटना
१) वेळ रात्री ०७•३८ – रास्ता पेठ, के ई एम हॉस्पिटल जवळ एका इमारतीत टेरेसवर आग
२) वेळ रात्री ०७•४० – कोथरुड, सुतार दवाखान्या जवळ दुकानामध्ये आग
३) वेळ रात्री ०८•१८ – वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग
४) वेळ रात्री ०८•२४ – कोंढवा बुद्रुक पोलिस चौकीसमोर कचऱ्याला आग
५) वेळ रात्री ०८•५० – नाना पेठ, चाचा हलवाई जवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर घरामध्ये आग
६) वेळ रात्री ०८•५२ – घोरपडी पेठ, आपला मारुती मंदिराजवळ झाडाला आग
७) वेळ रात्री ०८•५७ – कोंढवा, शिवनेरी नगर येथे इमारतीत टेरेसवर आग
०८) वेळ रात्री ०८•५८ – वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग
०९) वेळ रात्री ०९•०० – शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर वाड्यामध्ये आग
१०) वेळ रात्री ०९•१३ – केशवनगर-मुंढवा रस्ता, गुडविल सोसायटीत घरामध्ये आग
११) वेळ रात्री ०९•२७ – आंबेगाव पठार, चिंतामणी शाळा येथे भंगार दुकानामध्ये आग
१२) वेळ रात्री ०९•३१ – शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर तिसऱ्या मजल्यावर आग
१३) वेळ रात्री ०९•३२ – गुरुवार पेठ, कृष्णाहट्टी चौक येथे दुकानामध्ये आग
१४) वेळ रात्री ०९•५० – हडपसर, रासकर चौक येथे एका घरामध्ये आग
१५) वेळ रात्री ०९•५१ – पिसोळी, खडी मशीन चौक येथे अदविका फेज १ येथे घराच्या गॅलरीमध्ये आग
१६) वेळ रात्री १०•०८ – रास्ता पेठ, आगरकर शाळेजवळ छतावर कागदाला आग
१७) वेळ रात्री १०•०९ – लोहगाव, शिवनगर, वडगाव शिंदे रोड इमारतीत गॅलरीमध्ये आग
१८) वेळ रात्री १०•२३ – विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ इमारतीत गॅलरीत आग
१९) वेळ रात्री १०•२८ – वडारवाडी, पांडव नगर येथे घरामध्ये आग
२०) वेळ रात्री १०•३४ – धानोरी, विठ्ठल मंदिर येथे गवताला आग
२१) वेळ रात्री १०•४३ – गुरुवार पेठ, मामलेदार कचेरी जवळ घरामध्ये आग
२२) वेळ रात्री १०•५२ – बी टी कवडे रोड, सोलेस पार्कसमोर घरामध्ये आग
२३) कोंढवा, शिवनेरी नगर, ब्रम्हा एवेन्यू सोसायटी येथे गच्चीवर टॉवरला आग
रात्री १२ नंतरच्या आगीच्या घटना
२४) वेळ रात्री १२•३८ – गुरुवार पेठ, गोरी आळी येथे वाड्यामध्ये आग
२५) वेळ रात्री १२•५० – रास्ता पेठ, अपोलो थिएटर जवळ इमारतीत बाल्कनीमध्ये आग
२६) वेळ रात्री ०२•०६ – औंध, आंबेडकर चौक येथे कचरयाला आग
२७) वेळ रात्री ०३•१४ – बुधवार पेठ, तपकीर गल्ली दुकानामध्ये आग