Solapur Crime | पोलीस निरीक्षकावर पुण्यानंतर सोलापूरमध्ये विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल

0

सोलापूर :  एन पी न्यूज 24 – केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील (Police Training Center Kegaon) पोलीस निरीक्षकाने (Police Inspector) त्याच्या राहत्या घरी एका महिलेला बोलावून तिचा विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये (Solapur Crime) घडली आहे. याप्रकरणी सोलापूरमधील (Solapur Crime) विजापूर नाका पोलीस ठाण्यात (Bijapur Naka Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील (Pune) जुना गुन्हा मिटवून घेण्यासाठी पोलीस निरीक्षकाने त्या महिलेला घरी बोलावून घेतले. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवान माने Police Inspector Chandrakant Bhagwan Mane (नेमणूक महिला प्रशिक्षण, केगाव, सध्या रा. मधुबन सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. चंद्रकांत माने यांच्यावर यापूर्वी पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशन (Samarth Police Station) येथे 23 सप्टेंबर 2020 रोजी गु.रं.नं.1025/2020 भा.द.वि 376(2) (छ), 354 (उ),328, 417,504,507 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.

दरम्यान, फिर्यादी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास चंद्रकांत माने यांनी त्यांच्या मधूवन सोसायटी (Madhuvan Society), विजापूर रोड येथील घरी बोलावून घेतले. पीडित महिला घरी गेल्यानंतर माने यांनी तिला तू पुण्यात दाखल केलेला गुन्हा मिटवून घे, आपण पहिल्यासारखेच राहू असे म्हटले. त्यावेळी पीडित महिलेने हे प्रकरण न्यायालयात (Court) असून जो निकाल लागेल तो लागेल असे सांगितले. (Solapur Crime)

 

त्यावेळी पोलीस निरीक्षक माने यांनी पीडित महिलेला तु माझ्यावरील केस मागे घे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही
असे म्हणत महिलेला धमकी (Threat) दिली. त्यावेळी फिर्यादी यांनी आपले प्रकरण न्यायालयात सुरु आहे,
तू मला लग्नाचे आमिष (Marriage Lure) दाखवून फसवल आहेस, मी केस मागे घेणार नसल्याचे सांगितले.

त्यावेळी पोलीस निरीक्षक माने याने फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने मोबाइल देण्यास नकार दिला.
त्यानंतर माने यांनी महिलेचा हात पकडून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगीराज गायकवाड करीत आहेत.

Web Title :- Solapur Crime | Second case of molestation filed against police inspector in Solapur after Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शास्त्री रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1706 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Railway Protection Force (RPF) | रेल्वे सुरक्षा दलात (RPF) भरतीची जाहिरात बोगस, विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून आवाहन

Leave A Reply

Your email address will not be published.