Railway Protection Force (RPF) | रेल्वे सुरक्षा दलात (RPF) भरतीची जाहिरात बोगस, विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून आवाहन
नागपूर : एन पी न्यूज 24 – Railway Protection Force (RPF) | उत्तर भारतातील काही वेब पोर्टलवर काही दिवसांपूर्वी रेल्वे सुरक्षा दलात Railway Protection Force (RPF) तब्बल 900 पदासाठी भरतीची (Railway Recruitment) जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मात्र ही जाहिरात (Advertisement) बोगस (Bogus) असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) जाहीर करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबलच्या (Constable) 900 पदासाठी भरतीची (Railway Recruitment) जाहिरात बोगस असून या जाहिरातीवर विश्वास ठेऊन कोणीही अर्ज करु नये, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाचे नागपूर मंडळाचे विभागीय सुरक्षा आयुक्त (Divisional Security Commissioner, Nagpur Board) आशुतोष पांडे (Ashutosh Pandey) यांनी केले आहे.
उत्तर भारतातील काही वेब पोर्टलवर नागपूर रेल्वे सुरक्षा दलाच्या (Nagpur Railway Protection Force ) भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये नागपूर रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या 900 रिक्त जागांसाठी भरती (Railway Recruitment) सुरु असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) या जाहिरातीसंदर्भात आता स्पष्टीकरण दिले आहे. नागपूर सुरक्षा दलातील रिक्त जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात बोगस असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. Railway Protection Force (RPF)
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर हजारो तरुण-तरुणी या भरतीच्या तयारीला लागले होते.
काही जणांनी तर रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क साधून तयारीबाबत मार्गदर्शनही (Guidance) करण्यास सांगितले होते.
परंतु रेल्वेकडून अशी कोणतीही जाहिरात दिली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे कोणीतरी तरुणांची फसवणूक करत असल्याने आता रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण देऊन खुलासा केला आहे.
Web Title :- Railway Protection Force RPF | railway recruitment 2022 advertisement for recruitment in railway security force is bogus railway administration said don not to believe in advt
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ration Card | रेशन कार्डमध्ये जोडू शकता नवीन नाव, ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत