Solapur Lok Sabha | भाजप सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे सोलापूर जिल्हा विकासापासून वंचित : प्रणिती शिंदे

0

सोलापूर : Solapur Lok Sabha | सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या (Congress) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. वंचितचा (Vanchit Bahujan Aghadi-VBA) उमेदवार माघार घेऊन त्यांच्यासोबत गेल्याने सध्या प्रणिती यांची बाजू काहीशी मजबूत झाली आहे. गुरुवारी प्रणिती यांनी अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यात गावभेट दौरा केला. यावेळी त्यांनी शिंदखेडे, हसापूर, दोड्याळ या गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

शिंदखेडे गावात आमदार प्रणिती शिंदे यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजप सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे सोलापूर जिल्हा विकासापासून वंचित राहिला. त्यामुळे भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसला मतदान करा.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यावेळी शेतकरी विरोधी सरकारला आपल्याला धडा शिकवायचा आहे, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले. यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सिद्धार्थ गायकवाड व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर हसापूर (ता. अक्कलकोट) येथील प्रचारसभेत प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपचे मागील दोन्ही खासदार विकासकामे करण्यात अपयशी ठरले. अक्कलकोट तालुक्याचा पाणीप्रश्न कायम आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काँग्रेसला संधी द्या.

तर दोड्याळ (ता. अक्कलकोट) येथील सभेत प्रणिती शिंदे यांनी विश्वास व्यक्त करताना म्हणाल्या की, मतदारसंघातून महाविकास आघाडीला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. यावरून या निवडणुकीत बदल होणार आहे. महाविकास आघाडीच जिंकणार याची खात्री पटते.

Leave A Reply

Your email address will not be published.