राज्यात कोरोनाचा ‘शिरकाव’

दुबईहून आलेल्या ‘त्या’ ४० प्रवाशांचा शोध सुरु

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – दुबईहून आलेल्या पुण्यातील एका जोडप्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे त्यांच्यासमवेत दुबईहून आलेल्या विमानात असलेल्या सर्व ४० प्रवाशांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. एका खागी टूर कंपनीसोबत ते वर्ल्ड टूरला गेले होते. त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या दोन मुलांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, पती पत्नी दुबईहून १ मार्चला मुंबईमार्गे पुण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट घेतली होती. त्या पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. ते ज्या टॅक्सीतून आले आणि त्यांच्या सोबत ते ४० पर्यटक होते. ते दुबईला गेले होते. ते राज्यातील विविध शहरांमधील आहेत. त्यांचाही शोध घेऊन त्यांना लागण झाली आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. सध्या दोन्ही रुग्णांना सौम्य स्वरुपाची कोरोनाची लागण झाली आहे. हॉस्पिटलकडून दक्षता घेण्याचे काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

पुण्यात १ मार्चला आल्यानंतर काही दिवसानंतर त्यांना त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मागील सात ते आठ दिवसात हे दोघे कोणा कोणाच्या संपर्कात आले, याची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यामध्ये काही आजाराची लक्षणे दिसतात का याची तपासणी केली जाणार आहे. या दोघांबरोबर विमानात असलेल्या अन्य ४० प्रवाशांची माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.