ज्योतिरादित्य सिंधिया जाणार भाजपमध्ये?

बीजेपीच्या कोट्यातून मिळणार राज्यसभेचे तिकीट

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – मध्य प्रदेश काँग्रेसच्या सरकारवरील संकट आणखी वाढत असतानाच काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य सिंधिया हे भाजपमध्यये जाणार असल्याचे सांगितले जात आहे. केवळ पक्षातच ते प्रवेश करणार नाही तर त्या पाठोपाठ त्यांना राज्यसभेचे तिकीटही दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान, माजी मंत्री नरोत्तम मिश्रा हे आज दिल्लीहून भोपाळला रवाना होत आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता भोपाळमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. मध्य प्रदेशातील बदलत्या राजकारणावर गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. त्यात भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. याच दरम्यान राज्यपाल लालजी टंडन यांनी आपली सुट्टी रद्द करुन राज्यपाल भवनात थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या आमदारांची मंगळवारी सायंकाळी ५ वाजता बैठक होणार आहे. कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी सामुहिक राजीनामे दिले असून आता नवे सरकार स्थापन करण्यात येणार आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांपैकी सध्या २२८ आमदार आहेत. त्यात काँग्रेसचे ११४, भाजपचे १०७, ४ अपक्ष, २ बहुजन समाज पक्ष आणि १ समाजवादी पक्ष असे बलाबल आहे. काँग्रेसचे ६ मंत्र्यांसह १६ आमदारांनी बंगलुरु गाठले आहेत. ते प्रामुख्याने ज्योतिरादित्य शिंदे यांचे पाठीराखे असल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.