इराणमधील तुरुंगातून ७० हजार कैद्यांची केली सुटका
नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – कोरोनाचे सर्व जगात थैमान सुरु आहे. चीन, इटली नंतर कोरोनाचा सर्वाधिक फैलाव इराणमध्ये झाला आहे. इराणमध्ये आतापर्यंत १९४ जणांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन इराणने आपल्या तुरुंगातील ७० हजार कैद्यांची सुटका केली आहे. त्यांना सार्वजनिक स्थानावर न जाण्यास सांगण्यात आले आहे.
इराणमधील न्यायिक प्रमुख इब्राहिम रईसी यांनी समाजात असुरक्षेची भावना निर्माण होऊ नये, म्हणून हा उपाय करण्यात आला आहे. सुटका केलेल्या या कैद्यांना कोरोनाचे संकट टळल्यानंतर पुन्हा तुरुंगात परत यायचे आहे. मात्र, त्यांनी परत कधी यायचे ते निश्चित करण्यात आले नाही.
इराणमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी तेथे एकाच दिवशी ४९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे इराणमधील सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. परदेशात जाणारी विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे.