Sugar Mills In Maharashtra | ऐन निवडणुकीत महायुती सरकार मेहेरबान, 21 साखर कारखान्यांना थकहमी, कर्जाचा मार्ग मोकळा, 15 कारखाने सत्ताधारी गटातील

0

पुणे : Sugar Mills In Maharashtra | महायुती सरकारने २१ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यास मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर राज्याने एनसीडीसीला (NCDC) कर्जासाठी शिफारस केली. आता राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कर्ज देणार आहे. या कर्जाची रक्कम अद्याप निश्चित झालेली नाही.

थकहमी मिळालेल्या २१ कारखान्यांपैकी १५ कारखाने सत्ताधाऱ्यांच्या गटातील आहेत. इतर ६ कारखान्यांमध्ये २ शरद पवार, १ काँग्रेस, २ अपक्ष व १ राजकीय संबंध नसलेला आहे.

सत्ताधारी गटातील १५ कारखान्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी संबंधित २ नेते, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित ५ नेते, आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या कारखान्याचा समावेश आहे.

लोकनेते सुंदरराव सोळंके, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, हुतात्मा किसन अहिर, स्वामी समर्थ, संत दामाजी, श्री वृद्धेश्वर, लोकनेते मारुतराव घुले, किसनवीर (२ युनिट), कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी, राजगड, अगस्ती, सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे, मुळा, श्री तात्यासाहेब कोरे, श्री रेणुकादेवी शरद, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे, रावसाहेब दादा पवार घोडगंगा, श्री विठ्ठलसाई, विश्वासराव नाईक, श्री सिद्धेश्वर, अंबेजोगाई या २१ कारखान्यांचा राज्याने थकहमी दिली आहे.

सत्ताधारी गटातील कारखाने

  • विनय कोरे (अपक्ष आमदार) यांचा कोल्हापूरमधील तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना
  • प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी-अजित पवार) यांचा लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना
  • मंत्री संदिपान भुमरे (शिवसेना-एकनाथ शिंदे) यांचा छत्रपती संभाजीनगर येथील श्री रेणुका शरद सहकारी साखर कारखाना
  • राष्ट्रवादीचे आमदार मकरंद जाधव पाटील यांच्या सातारा येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे दोन युनिट
  • धाराशिवमधील काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बसवराज पाटील यांचा श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना.

विरोधी गटातील कारखाने

  • शिरूरचे आमदार अशोक पवार यांचा (राष्ट्रवादी- शरद पवार) रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना
  • मानसिंगराव फत्तेसिंगराव नाईक यांचा विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना
  • भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा रायगड सहकारी साखर कारखाना
  • शिवसेना उबाठाचे नगर जिल्ह्यातील माजी मंत्री यशवंतराव गडाख यांचा मुळा कारखाना
  • राजेंद्र नागवडे यांचा सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे एसएसके
  • सोलापूरमधील धर्मराज काडादी यांचा श्री सिद्धेश्वर यांच्या कारखाना.
Leave A Reply

Your email address will not be published.